पन्नास टक्क्याचे आरक्षण हा विषय कधी सुरु झाला हे मला माहिती नाही. कदाचित खुप जुना असेल. पण जोरदार चर्चा व्हायला लागली तेव्हा समजला. पण वैयक्तिक मी माझ्या साठी माझ्या कंपनी मध्ये हा निर्णय खुप आधी म्हणजे हा निर्णय ऐरणीवर येण्या आधी करून टाकला होता. हा निर्णय सामाजिक बांधिलकी मधून वगैरे अजिबात आला नव्हता, हे कबुल करतो. व्यवसायाच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा वर्षापूर्वी, मुलांबरोबर काही मुली मुलाखतीला आल्या. तुलनेने चांगल्या म्हणजे सबंधित कामासाठी आवश्यक सर्व गुण असणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याना संधी मिळाली. काम उत्तम करू लागल्या. आणखी काही मुली कंपनी मध्ये आल्या. मुले ही आली. काही वर्षांनी जाणवण्या इतका फरक दिसायला लागला. ” स्कोर काय झालाय ? सचिनच्या किती ? किती मतांनी आपला उमेदवार पुढे आहे ? शुक्रवारी कुठे ‘बसायचे’ ? पक्याची “लाईन” लाऊन देण्यासाठी खलबत कधी करायची ? ……..वगैरे असल्या भानगडी मुलींच्या बाबतीत नव्हत्या. हे जाणवायला लागलं. हेही जाणवायला लागलं की अवलंबून किंवा विसंबून राहू शकू अशा कंपनीतल्या व्यक्तिंमध्ये मुली अग्रक्रमाने पुढे आहेत. माझ्या डोक्यात आजवर नसलेला लिंगभेद असा घुसला. आणि काही पदांसाठी फक्त मुलीच घ्यायच्या असा निर्णय कंपनीच्या फायद्या साठी घेतला गेला. त्यामुळे आज करोडो रुपयांची खरेदी, करोडो रुपयांचा हिशोब, करोडो रुपयांच्या प्रकल्पांची तांत्रिक बाजू तपासून त्यांचे विक्रीच्या किमती ठरविणे, आलेल्या अश्या ऑंर्डेर्सचे अचूक अंदाज पत्रक तयार करून प्रकल्प संपेतो पर्यंत त्यातल्या नफ्याकडे बारीक लक्ष्य ठेऊन नफा मिळविणे – खरेतर अंदाजापेक्ष्या ज्यास्त नफा कंपनीला मिळवून देणे अशी अनेक म्हंजे तंत्रज्ञान आणि अर्थ या सारख्या सर्वात महत्वाच्या खात्यांमध्ये माझ्या कंपनीत बायका नेतृत्व करतात. सर्वात महत्वाचे सत्य असे की माझा वारू बेफाम अन्यान्य ठिकाणी उधळलेला असतो, उदाहरणार्थ असे लेख वगैरे लिहायला मला वेळ मिळतो कारण माझ्या कंपनीची दुसरी संचालक माझी बायको आहे. कॉस्ट अकौंटंट आहे. त्यामुळे व्यवसायाची आर्थिक बाजू प्रचंड क्षमतेने आणि अचूक ती सांभाळते. त्यामुळे मला व्यावसाईक टेन्शन गेले अनेक वर्षे अक्षरश: शून्य. व्यवसायातल्या अनेक घडामोडीविषयी आवश्यक असणारा आर्थिक सल्ला मला आयता मिळतो, हवे तेव्हा. शेवटी व्यवसाय म्हणजे फक्त अर्थ, बाकी सगळे अर्थ उभारणी साठी !! त्यामुळे अर्थ खातेच जर पराकोटीच्या जबाबदारीने सांभाळले जात असेल तर माझा वारू उधळण्या व्यतिरिक्त करू काय शकतो ?
कार्यस्थळी अफाट क्षमता असलेल्या बायकांच्या बाबतीत काही वेळा मात्र कधी कधी विचित्र खरे तर मला भीषण चीड आणणारा अनुभव येतो आणि मी बायकांनाच त्या साठी जबाबदार धरतो. गेल्या वर्षी मला माझ्या व्यवसायातल्या एका विभागासाठी ‘General Manager’ पदासाठी उमेदवार हवा होता. महिला उमेदवार असावा अशी अट नव्हती. पण ज्या कंपनीने आमच्यासाठी काही उमेदवार निवडले त्यात दोन पुरुष आणि दोन महिला उमेदवार होत्या. त्यातल्या दोन महिला आणि एक पुरुष उमेदवारांशी मी प्रत्यक्ष्य अर्धा अर्धा तास फोन वर बोलून मुलाखत घेतली. त्यातून एक महिला आणि एक पुरुष निवडले. दुसऱ्या फेरीच्या मुलाखतीनंतर ती महिलाच पास झाली. तिच्याशी आणखी एक प्रदीर्घ गप्पा मारण्याचा निर्णय मी घेतला. एका आठवड्याने बाई आल्या. उत्तम प्रोफाईल होते. दणदणित शिक्षण. इंग्रजी वर प्रभुत्व. वय सुमारे पंचेचाळीस. इंडस्ट्रीमध्ये मला आवश्यक असणा-या क्षेत्रात प्रदीर्घ आणि प्रचंड अनुभव. कामाच्या ठिकाणी नेतृत्व केल्याच्या खुणा. वगैरे. मी खुष. कारण मला हवा तसा उमेदवार मिळाला. सर्वात शेवटी मी त्या बाईंच्या पगारा विषयी अपेक्षा विचारल्या. त्यांनी मला जो आकडा सांगितला तो माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच होता. त्यामुळे मी तीन मिनिटात मान्यता देऊन विषय संपविला. दोनेक दिवसात नेमणूकी संदर्भातील पत्र कंपनी कडून बाईना गेले. बाईंचा चार दिवसांनी फोन. भेटायला यायचे आहे. मला वाटले. पगाराविषयी त्यांचा अंदाज चुकला असणार. त्यामुळे पुन्हा बोलायचे असेल. बाई आल्या. केबिन मध्ये आल्या. बसायच्या आत त्यांनी मला सांगितलं मिस्टर आलेत आणि त्याना काही तुमच्या सोबत बोलायचे आहे. त्याना आधी मी बसायला सांगितलं. मग विचारलं. ” काय बोलायचं आहे त्याना ?” त्या म्हणाल्या हेच कामाविषयी !!! मी जबरी ओशाळलो. म्हटलं मला कामा विषयी जे बोलायचे आहे “ते गेल्या तीन भेटीत तुमच्याशी बोललो आहे, त्याचा तुमच्या नव-याशी काय संबंध ?”
” नाई सर. सगळं मान्य आहे. पण प्लीज. पाच मिनिटं वेळ द्या.
मी नाईलाजानं हो म्हटलं.
तो बाबा आला. नमस्कार चमत्कार झाला. तो काय करतो हे त्याने सांगितलं. कंपनी काय काय करते हे विचारलं. बाबा सल्लागार आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांना गुणवत्ते विषयी सल्ला देतो. पुढे तो बोलू लागला ” मला हिने सांगितले हिच्यावर मोठी जबाबदारी द्यायचे तुम्ही ठरविले आहे. आम्हाला आनंद आहे. पण मला काही बोलावे असे वाटले म्हणुन मी आलो. आमची ही जरा तापट आहे. शीघ्रकोपी आहे……….” मी कानाला खोटा खोटा मोबाईल लावला आणि माझ्याच केबिन मधून त्याची बडबड चालू असताना सटकलो. केबिन बाहेर बसलेल्या मदतनीसाने मी सांगितलेला निरोप त्याना दिला. ” साहेबांना तातडीचा फोन आलाय आणि दुस-या युनिटवर जावे लागले. तुम्हाला पुन्हा बोलावू. “
त्याच दिवशी बाईंची नेमणूक रद्द केल्याचे पत्र बाईना पाठवून दिलं.
गेल्या आठवड्यात मी एका पोर्टलवर एक आयटी संबधित वरिष्ठ उमेदवार शोधत होतो. नाशिकमध्ये नोकरीसाठी “आयटी” मधला कुणी उमेदवार ज्याला किमान पंधरा वर्षाचा अनुभव आहे असा मिळणं जरा अवघडच. पण मिळाला. बाई आहेत. सतरा वर्षे TCS मध्ये कामाचा अनुभव. सध्या वास्तव्य नाशिकमध्ये. नोकरी नुकतीच सोडलेली. जबरदस्त अनुभव. एकच मोबाईल नंबर होता, बायोडाटावर. लगेच मोबाईल वर फोन लावला. तो मोबाईल नंबर होता, बाबाचा. बाईंच्या नवरोबाचा. त्याला मी माझी ओळख करून दिली. फोन करण्याचे कारण सांगितले. बाईंचा बायोडाटा नेटवर पाहिल्याचे सांगितलं. त्याने मलाच दहा प्रश्न विचारले. तो फोन नंबर बाईंचा नव्हता. बाबाचा होता !! म्हणजे आधी हा सर्व ठीकठाक आहे का पाहणार आणि मग ठरविणार बायकोला तिकडे पाठवायचे की नाही ते! अहो त्या बाई आयटी इंजिनियर ! सतरा वर्षे इंडस्ट्री मध्ये काम केल्याचा अनुभव. त्याना कुठे नोकरी करायची याचा डायरेक्ट निर्णय घेता येत नाही ?

बायका असे वागतात ? मला इथे येणारे म्हंजे अंगावर धावून येणारे उत्तर माहिती आहे. ” त्या नाई अश्या वागत. त्यांचे नवरे, पुरुष त्यांना धाकात ठेवतात !!, वगैरे वगैरे तत्सम ….मला चीड याच उत्तरांची आहे. एव्हढं त्या नवऱ्याला घाबरण्यासारखं किंवा धाकात राहण्यासारखं त्यांच्यात म्हणजे नव-यात -काय असतं ? इतक्या शिकलेल्या, अनुभव असलेल्या, कार्यस्थळी वाघीण असणा-या बायका नवरा किंवा कुटुंबाच्या बाबतीत म्याव का असतात? करिअरच्या बाबतीत त्याना स्वत:चे स्वातंत्र्य का अबाधित ठेवता येत नाही? शैक्षणिक, वैचारिक आणि आर्थिक क्षमता असणा-या बायका नव-या वर इतक्या अवलंबून का असतात ? सगळ्या नसतील. पण खूप संख्येने असतात. बायकांची करिअरची संकल्पना कुटुंबाला आधार अशीच असते का ? म्हणजे ज्याला आधार द्यायचा त्यालाच पहिली प्रायोरिटी असेच का असते ? असे असायला हरकत नाही पण कुटुंब अनेक जणांचे बनते ना ? ” रजा पाहिजे. मुलाची तब्येत ठीक नाही. पुन्हा सहा महिन्यांनी त्याच कारणासाठी पुन्हा हीच रजा घेते. या खेपी नवरा का नाही? परवा पुणे आकाशवाणीवर विविध भारती मध्ये कुणीतरी डॉ संजय उपाध्ये गळा काढून एक अनुभव सांगत होते. एक आई मुलीला पाळणा घरात सोडून जात होती. मुलीचा केवीलवाणा चेहरा पाळणा घराच्या खिडकीतून यांना दिसला. जो ते कित्येक दिवस म्हणे विसरू शकले नाहीत. मुलीला आई पाहिजे होती. पण आई नोकरी करणारी. म्हणजे आई मुळे पोर केविलवाणी होते. पण यांनी बापाचा उल्लेख भाषणात नाही केला. म्हणजे बाबाने नोकरी करायची हे अध्यहृत! २०१२ साला मध्ये पुण्या सारख्या ठिकाणी आकाशवाणीवर अशी भाषणे लावतात कशी ? बरे त्यांच्या भाषणा आधी निवेदन एका बाईने केले होते, म्हणजे निवेदिकेने !!! घरी प्रसंगी बंड करायचे धाडस कार्यालयात वाघीण असणा-या बायकां कडे नसते का? काही ठिकाणी तर नव-या पेक्षा ही ज्यास्त कमविते. पण तरी म्याव असते. माझी एक मैत्रीण आर्कीटेक्ट आहे. स्वत:चा व्यवसाय करते. यांचा व्यवसाय असा असतो की त्याना संध्याकाळी किमान आठ वाजे पर्यंत कार्यालयात चर्चे साठी थांबावेच लागते. संध्याकाळी कंत्राटदार रिपोर्टिंग करायला येतात किंवा नोकरदार गि-हाइके सल्ले मागायला येतात वगैरे. हिची कमाई नव-या पेक्षा बक्कळ ज्यास्त आहे. नवरा नोकरी करतो. तो सात वाजता घरी येतो. ही साडे सहाला घरी. कारण नव-याला तव्या वरची गरम पोळी लागते !!! कमाईपेक्षा कौटुंबिक आनंद महत्वाचा, नाती महत्वाची, तो तिचा निर्णय आहे वगैरे अशा टिपिकल चर्चा मला फडतूस वाटतात. त्यात किती खरे पणा असतो याची मला शंका आहे. बायकांनी करिअर विषयीची संकल्पना आता तरी बदलली पाहिजे असे वाटते.जमेल तितकी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नोकरी किंवा घरी बसुन वेळ जात नाही म्हणुन टाइमपास करण्या साठी नोकरी याच्या पलीकडे जाऊन स्वत:चे व्यक्तिमत्व शोधण्यासाठी, त्याला झळाळी देण्यासाठी, निर्मितीचा धोधो आनंद मिळविण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वत:च्या क्षमतेची ओळख होण्यासाठी …….. का नाई ?
superb Sudhir….