जून महिना तेच छान पावसाचे दिवस आणि शाळेची खरेदी. दरवर्षीची जून महिन्याची अगदी ठरलेली सुरुवात आहे. अगदी आपल्या लहान पणा पासून. गणवेश, वह्या, पुस्तकं, बूट मोजे , कंपास पेटी या सगळ्या ठरलेल्या पदार्थांची खरेदी. कधी कधी याच सामना बरोबर रंग पेटी सुद्धा- बाबांचे बजेट असेल तर नाई तर सप्टेंबर चे आश्वासन घेऊन शांत व्हायचे. रंग पेटी वा अन्य एखाद्या मागणीवर शांत करायला आणखी छान उपाय वापरला जायचा तो कंपास पेटीच्या brand चा. कॅम्लिन ची कंपास पेटी घेऊ या. असे म्हणता क्षणी बाकीच्या मागण्या विरघळून जायच्या. कॅम्लिन ची पेटी तुलनेने इतर पेट्यापेक्षा महाग असायची, त्यामुळे सुरुवात दुस-या कोणत्यातरी पेटीच्या खरेदीने व्हायची. पण कॅम्लिन ची कंपास पेटी हे एक पदक असायचे . त्यामुळे शाळेत ती एक पदक म्हणूनच मिरावायचो.
कॅम्लिनचा शालेय जीवना पासुनच मनावर एक खोलवर एक ठसा उमटुन गेलाय. तो कॅम्लिनच्याच खोडरबरने अशात:ही न पुसला जाण्यासारखा आहे. आता बाप झाल्यावर मुलांच्या शाळेच्या चर्चा करताना , त्यांच्या शालेय सामानाची खरेदी करताना साहजिकच पिवळ्या रंगावर केशरी पट्टा असलेल्या आणि उंटाचे चिन्ह असणाऱ्या कंपास पेटी कडेच वळायला होतं. आणखी एका कारणांनी कॅम्लिन हे पदक गेल्या काही वर्षापासू वाटायला लागलं होतं. कॅम्लिन उद्योग समूह म्हणून. एक उद्योजक म्हणुन मला स्वत:ला कॅम्लिन कडे बघताना अभिमान वाटायचा. अभिमान विशेषत: याचा की कॅम्लिन हा एक मराठी उद्योग समूह आहे . सुरुवातीच्या कालावधी मध्येच नव्हे तर स्थिरस्थावर झाल्यावरही मलाच काय सगळ्याच उद्योजकांना काही ना काही समर प्रसंगाना सामोरं जावं लागतं. या प्रसंगातून फक्त आणि फक्त स्वत:लाच मार्ग काढावा लागतो. अशावेळी काही उद्योगांचा जवळून केलेला अभ्यास उपयोगी पडतो. त्यामुळे case studies म्हणुन अभ्यास्याला कॅम्लिन वा किर्लोस्कर यांच्या सारखे उद्योग समूह अधिक जवळचे – मराठी म्हणुन. काकासाहेब दांडेकरांनी पोटापाण्यासाठी १९३१ साली सुमारे ऐशी वर्ष पुर्वी गिरगावातल्या एका चाळीत शाई बनवून विकण्याचा उद्योग चालू केला. त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ नानासाहेब दांडेकर ही होते. कॅम्लिन हा ब्रांड जन्माला आला १९९४५ साली. त्या नंतर हा व्यवसाय सतत वाढत गेला. दांडेकरांच्या तीन पिढ्यांनी या व्यवसायाचा भार बऱ्यापैकी यशस्वीपणे पेलला होता. देशभरातल्या सहा कारखान्यांमार्फत त्यांची आगे कूच चालु होती. पण आता कॅम्लिनला जागतिकीकरणाच्या रेट्यात होणारे सोस कदाचित झेपत नसतील. विशेषत: मला कॅम्लिनची संशोधनाची बाजु कमकुवत वाटते. आज स्पर्धा जीवघेणी आहे. वर्षानुवर्षे संशोधन करून बाजारात आणलेल्या उत्पादनाचे बाजारातले आयुष्य एखादे वर्ष किंवा अगदी काही महिनेच असू शकते. त्यामुळे उद्योग जिवंत ठेवण्यासाठी अन्य उत्पादने वा बाजारातून नामशेष होणाऱ्या उत्पादनाची पुढची आवृत्ती लगेच वाजत गाजत उतरवावी लागते. किंबहुना आपले आजचेच उत्पादन उद्या आपल्या एका सुधारीत उत्पादनाने नामशेष करावे लागते. आपल्याकडून जर ही खबरदारी घेतली गेली नाही तर स्पर्धक त्याच्या खेळीनी आपले उत्पादन मारायला तयार असतोच. जशी ही प्रत्यक्ष्य स्पर्धेची तलवार सतत उत्पादकांच्या मानेवर असते तशी एक आणखी भीषण स्पर्धा हल्ली उत्पादकांना सतावत असते. ही स्पर्धा म्हणजे अंधारातली लढाई असते. समोर कोण असेल कशामुळे आणि कुठून घाव बसेल हे सांगताही येत नाही. उदाहरणार्थ सकाळी आपल्याला उठवणाऱ्या गजराची घड्याळे घ्या. एका घड्याळे बनविणाऱ्या ‘अ’ उत्पादकाने घड्याळेच बनविणाऱ्या “ब” उत्पादकाच्या घड्याळाहून वरचढ गुणवत्तेची घड्याळे सतत बाजारात आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले , पैसा खर्च केला तर “अ” घड्याळे ज्यास्त विकली जातील ही साधीसरळ प्रत्यक्ष स्पर्धा झाली. आता भीती अशा प्रत्यक्ष स्पर्धेची नाही. आज गजर लावायला घड्याळाकडे जातो कोण? आपण गजर mobile वर लावतो ना! आपल्याला स्पर्धक म्हणुन बाजारात mobile फोन वापरले जातील याची कल्पनाही घड्याळ उत्पादकांना आली नसेल. कॅमेराचे ही तसेच. जगात सगळ्यात ज्यास्त कॅमेरे mobile उत्पादक बनवितात !!!! लिखाणाच्या , स्टेशनरीच्या बाजारात अशीच भीषण स्पर्धा आहे आणि आता ती जागतिक स्तरावर आहे. या स्पर्धेमध्ये टिकाव लागण्यासाठी प्रचंड भांडवलाची ही आवश्यकता असते आणि त्याही पेक्ष्या अधिक प्रमाणात लागते ती टिकून राहण्याची विजीगिषु वृत्ती आणि प्रचंड हिम्मत. या तीनही बाबतीत कॅम्लिनने हार मानली हे मराठी उद्योगाचे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या कॅम्लिनचा बळी गेला असेल. कॅम्लिन ही कंपनी जपानच्या कोकुयो कंपनीला मे महिन्याच्या अखेरीस विकली गेली. एक सामान्य मराठी नागरिक म्हणुन ही बाब धक्कादायक आहे आणि एक उद्योजक म्हणुन मला खंतावणारी आहे. युरोप, अमेरिकेतल्या कित्येक कंपन्या शंभर वर्षे जुनी कंपनी, दीडशे वर्षे जुनी कंपनी अशी बिरुदावली छातीवर मिरवतात. आणि हजारो, लाखो कोटींची उलाढाल करतात. मोटारींपासून कोक पर्यंत अगदी जॉकीची अंतर्वस्त्रे बनविणाऱ्या कंपनी पर्यंत कित्येक उद्योग शंभराहून अधिक वर्षे जुने आहेत. उलाढालीमध्ये जरी नसेल पण वय आणि ब्रांड या दोनहीच्या स्पर्धेत कॅम्लिनसारखी एखादी जुनी कंपनी मराठी झेंडा हातात घेवून उभी असावी असे मनोमन वाटत असताना मध्येच त्यांनी आपले हात पाय गाळुन बसावे हे क्लेशदाईच आहे. पण कॅम्लिनवाले म्हणतील की कंपनी आमची, उत्पादने आमची आम्ही काय करायचे ते आमचे आम्ही ठरवू ना! बाकीच्यांनी वैयक्तिक मामल्यात लुडबुड करायचे काही कारण नाही. हेही खरच म्हणा. कायद्याने आम्हाला त्यांच्या निर्णयावर भाष्य करण्याचाअधिकार नाही .पण माणसाच्या आयुष्यात फक्त कायदाच नसतो ना. बालपणीच ज्या ज्या म्हणून कशात आपण गुंततो , ते सगळेच आयुष्य भर आपल्याबरोबर राहते, एक उबदार आठवण म्हणून. आणि प्रचंड भावनिक गुंतवणूक झालेली बाब विरळ वा अदृश्य होणे असह्य होते. जरा संतापजनक बाब आहे ती अशी की एका बाजूला स्वदेशीची कास धरत कॅम्लिन हा उद्योग एका परदेशी कंपनीच्या घशात घातला गेलाय. ज्या जपानी कंपनीला कॅम्लिन शरण गेली ती १०५ वर्षे वयाची जुनी कंपनी आहे. म्हणजे कॅम्लिन पेक्षा सुमारे पंचवीस वर्षे च जुनी. आदरणीय काकासाहेब दांडेकरांनी चाळीमध्ये शाई बनविण्याचा उद्योग सुरु केला तसाच कोकुयो कंपनीचे संस्थापक कुरोडा यांनी अगदी छोट्या स्तरावर त्यांच्या घरामध्ये फाईली बनवायला चालु केल्या होत्या. कॅम्लिन ची उलाढाल आज सुमारे साडेतीनशे कोटी रुपये असेल तर जपानी कोकुयो कंपनीची वार्षिक उलाढाल पंधराशे कोटी रुपये आहे. आज दांडेकर कुटुंबीय जरी चेअरमन आमचाच असेल असे सांगून भारतीयांचे सांत्वन करीत असले तरी त्यांचा वाटा अल्प आहे आणि चेयरमनची अवस्था ही लगान चित्रपटा मध्ये कुलभूषण खरवंदा यांनी रंगविलेल्या “राजा” सारखी असणार का अशी शंका आहे. एका वृत्तपत्राने स्पष्ट लिहिल्याप्रमाणे कोकुयो कंपनी त्यांचा झेब्रा ब्रांड बाजारात आणेल आणि कॅम्लिनचा उंट हळूहळू गायब होईल. काकासाहेबांनी आधी त्यांचे चिन्ह घोडा ठरविले होते असे म्हणत्तात. पण उंट जसा पाणी धरून ठेवतो तशी फौंटन पेन शाई धरून ठेवतो म्हणून कॅमेल ब्रांड हा पुढे आला. त्या पुढे Camel आणि Ink हे शब्द मिसळून त्यांनी Camlin हा ब्रांड तयार झाला. पण आता आगामी पिढ्या या समृद्ध आणि उद्योग समूहाची चर्चा करतील ती फक्त त्या उंटाच्या जीवाश्माच्या…आधारे, कारण काळाच्या ओघात कॅम्लिनचा उंट कदाचित विस्मृतीत गेला असेल.
Monthly Archives: July 2012
झेब्र्याने गिळले उंटाला !!!
Filed under Uncategorized
बिल्लेकर
“….अप्पांनी खास तुमाला आमंत्रन द्याय सांगतलय. नक्की याच.”
” अरे पण अप्पा तयार झाले कसे ? जरा आश्चर्यच वाटतंय. ”
“हा दादा, कमाल झाली खरी. गावाच्यानी या एळी पार हट्ट केला. शेवटी हुकमी एक्का गाठला. ताईसाकड गेले. ताईसा हो म्हणली. म्हणली करू. म्हणली मी मनौते अप्पास्नी.अप्पा म्हणले कुनी राजकारनी नको मंचावर तर तयार हुईल. ताईसा हो म्हणली. मग काय दिवाळीच.कारकान्याच्या मैदानवच ठुलाय पोग्राम. नक्की याव.”
ताईसा अप्पांची धाकटी मुलगी. वय असेल ३२ च्या आसपास. पण अख्ख्या गावची ताई. सोलापुरच्या मेडिकल मध्ये MBBS झाली. आणि पुण्यात बीजेला MD. लग्न ठरलं मुंबईच्या डॉक्टरशी. त्याला हिने पहिल्याच भेटीत अट घातली. मला गावाकडेच राहून लोकांची सेवा करायचीय. तिकडे येणार असाल तर लग्न करेन. अप्पाना तिने अशी अट घालणे आवडलं नव्हतं असं म्हणतात. पण मुलगा भला माणूस. मुंबई सोडली. तिच्या बरोबर गावात राहिला. दोघेही आज पंचक्रोशीतल्या रुग्णांची अहोरात्र सेवा करत असतात. ताईसा अप्पांइतकीच सेवाभावी. कणभर सरसच. अप्पांचे अतिशय लाडकं कोकरू. अप्पांचा प्रचंड जीव तिच्यावर. अप्पा एक महान सहकारसम्राट. गावचा विकास हा एकमेव ध्यास. परिसराच्या विकासासाठी तीसेक वर्षापूर्वी आधी साखर कारखाना चालू केला. मग डेअरी, शाळा, बरच काही. राजकारण आणि राजकारणी यांच्या पासून पूर्ण अलिप्त. आता तर कारखान्याचे चेयरमनपदही सोडलंय. आत्ताचा चेयरमन भरतासारखा त्यांच्या खुर्चीवर न बसता कारखाना चालवतो. इतका मान. खरेदीच्या मिटिंग मध्ये माझे प्रेझेन्टेशन झाले. सहा सात वर्षे झाली असतील. पांढरे शुभ्र धोतर आणि कडक स्टार्च केलेली गांधी टोपी घातलेला हा इसम खाडखाड इंग्रजीत प्रश्न विचारात होता. आणि एकदम नेमके प्रश्न. उगीच शोमनशिप नाही.बेहद्द प्रेमात पडलो. तेव्हा पासून आज तागायत आमच्यात व्यावसाईक सबंधापलीकडले छान नाते निर्माण झाले. गेल्या तीनेक वर्षात गावाकडे येऊन भेटणे जमले नव्हते. आज छान योग जुळून आला. गाव इतकं छान नटल होतं की मीठ मोहरी फिरवून दृष्ट काढावी. रांगोळ्या, पताका, तोरणं. वाजंत्री. उत्सवच ! कार्यक्रम मस्तच झाला. अगदी देखणा. ताईसाच्या बोलण्याने सारा गाव हेलावला. तरुण वयात केवढी समज, केवढी प्रगल्भता! मांडवातच जेवणाच्या पंगती बसल्या. सुटातले, बुटातले सगळे मांडी घालून बसले. भात.मटकीची उसळ. गोडाला बुंदी. बेत एकदम फक्कड. अप्पानी सदरा काढला. बंडीवर बुंदीचा हारा घेऊन स्वत: आग्रहाने प्रत्येकाला वाढत होते. वाढताना प्रत्येकाला नावाने बोलत होते. ” कारे, बाईडीने सकाळी नुस्ते फोन वरच दंडवत घातलं. फुडल्या येळला पोरं अन तिला घेतल्या शिवाय याऊ नगो बर का.” मी म्हटलं ” हो अप्पा, नक्की.” सारे काही डोळ्याचे पारणे फेडणारे. हात धुतले. अप्पांचा, ताईसाचा, अतुलराजचा निरोप घेतला. जाताजाता कारखान्यावर चक्कर मारायची होती. निघालो. जितका अप्पांवर तितकाच कारखान्यावर माझा जीव. याच कारखान्याने पहिली ओर्डर दिली होती, उमेदवारीच्या दिवसात. त्यामुळे फुल्ल इमोशनल लागेबांधे. कारखान्यातल्या प्रत्येक माणसाशी सुद्धा. आज कारखान्यात कुणी फारसे दिसत नव्हतं. सगळे तिकडे उत्सवात दंग असणार ना! कुणीच भेटलं नाही. डेरीकडच्या स्टोअर्सकडे जावे की नाही असा विचारच करत होतो. एकतर तिथे ही कुणी नसेल. आणि दुसरे, चालत जायला अंतर बरच होतं. जेवण साधंच असलं तरी सॉलिड रुचकर असल्यामुळे चापून झालं होतं. त्यामुळे चढलं होतं. चालायचा कंटाळा आला होता. पण म्हटलं नको. एकतर तीनेक वर्षांनी आलोय. इथून गेल्यावर चुटपूट लागुन राहील. पुन्हा कधी यायला जमेल कोण जाणे. त्यातच अप्पांनी दम भरलाय. बाईडीला घेतल्या शिवाय येऊ नको म्हणून. त्यामुळे तिच्या बरोबर यायला कधी जमेल सांगता नाही येत. स्टोअर्सकडे जायला निघालो. इकडे नियमित यायचो तेव्हा हमखास स्टोअर्स मध्ये चक्कर व्हायची. त्यामुळे तिथले अनेक जण चांगले परिचित. आत मध्ये खरच सामसूम होतं. कुणी दिसत नव्हतं. स्टोअर्स खूप मोठ. अजस्त्रच. आत मध्ये फिरलो इकडे तिकडे. कुणी भेटतंय का शोधत. आजही तसंच राहिलंय हे. काही बदल नाही. अंधारलेलं. प्रचंड सIमान. इकडे तिकडे मशीन पार्टस. जुन्या मशिनरी. ” कोण ?” एक खोलगट, घोगरा आवाज आला मागुन. मागे चमकून बघितलं. डाव्या बाजूच्या जरा ज्यास्तच अंधारलेल्या कोपऱ्याजवळ खोलीतून आला होता आवाज. मी झपझप पावले टाकत तिकडे गेलो. इथे तरी कुणी भेटेल. आत डोकावले तर बिल्लेकर. काम करत बसले होते. बिल्लेकरच आणि माझे एकदा चांगलंच वाजलं होतं. त्याच्यामुळे माझे एक सहा लाखाचं बिल अडकून पडलं होतं. त्याला क्वालिटी कंट्रोलची सही बिलावर पाहिजे होती आणि क्वालिटी कंट्रोलचे काही तरी वेगळेच म्हणणे होते. माझा जीव कावला होता कारण माझे पैसे अडकले होते.
” नमस्कार, बिल्लेकर साहेब.”
“नमस्कार.” हो तोच खोलगट घोगरा आवाज.
“ओळखलं का.”
“आ, हो, या या.”
“अहो सगळी कारखान्यातली माणसं तिकडे सोहळ्यात आहेत आणि तुम्ही एकटे काय करताय इथे ?”
” हा हा हा हा ” बिल्लेकर नुसतेच हसले, मोठ्याने.
” झाली का आपांची भेट ”
मी हो म्हणालो.
” गेल्या आठवड्यात ते तुमचे मित्र आले होते. ”
” कोण हो ?” मी जरा त्रासून विचारले.
” ते हो, तुमच्या बरोबर पुण्याहून यायचे. पाईपा विकायचे ”
माझ्या चेहऱ्या वरचे भाव बदलले. कारण बिल्लेकरने थाप मारली होती. त्याही वेळी तो मला ढोंगी वाटायचा. त्यामुळे आवडायचा नाही. पण मी आपला अडला नारायण ..
” हा तो झामरे ना ? ”
” हा, झामरे. बरोबर.तो आला होतं, गेल्या आठवड्यात.” पुन्हा साल्याने थाप मारली.
“कसं शक्य आहे, बिल्लेकर साहेब. झामरे गेल्या वर्षी नाई का दिवाळीत अपघातात वारला ?”
“नाई ओ, असं कसं ? मला कॅलेंडर देऊन गेला ना गेल्या आठवड्यात ” पुन्हा, पुन्हा माठ्याने सणसणीत थाप लगावली. मी भिंती वरती पाहिलं इकडे तिकडे. तर बिल्लेकरच्या खोलीत चक्क 2009 चे कॅलेंडर एका कोपऱ्यात लटकत होतं. मी मनाशीच म्हटलं याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. निघावं.
“येतो, भेटू पुन्हा”
हसला. भरल्या बादलीत तांब्या बुडवताना होणाऱ्या आवाजा सारखा हसला.
निघालो. हा बिल्लेकर अगदी तस्साच आहे हं अजुनी. कार्टून. काहीच फरक नाही. भिंगांचा चष्मा.कपाळावर भंडारा. अर्ध्याबाहीचा घाणेरडा मळका शर्ट. शर्ट ला दोन खिसे. दोन्ही खिसे चीठ्ठ्यांनी ठासुन भरलेले. बिल्लेकर खिश्यात फाईलींग कॅबिनेटच घेऊन फिरतो. मी त्याला चेष्टेने म्हणायचो. ” बिल्लेकर, येत्या दिवाळीला निरमाच्यावड्या देणार आहे, भेट वस्तु म्हणून. शर्ट धुवा पांडव पंचमी पर्यंत.” असं एकदा बोलल्यावर माझ्यावर जाम भडकला होता. पण फारसा बोलला नाई. गाडी आता चीफ केमिस्ट साहेबांच्या घराकड वळवली. गावाबाहेर त्यांच्या मळ्यात ते राहतात. छान टुमदार घर आहे. केमिस्ट काकुंशी आपली खास गट्टी होती. म्हंजे आहे. त्यांचा चहा मला फार आवडायचा. सर नाई भेटले तरी काकू भेटतीलच. बापरे, गावाबाहेर बरीच वस्ती वाढलीय. हा बंगलाही इथे नवीनच दिसतोय कुणाचा तरी. सोहळा पूर्ण संपलेला दिसतोय. मंडळी घरी परतताना दिसत होती. गाडी अंगणाशी थांबली तशी अंगणात खेळणारी एक सात आठ वर्षाची पोर घरी आत पळाली. केमिस्टकाकु बाहेर आल्या, त्या पोरी बरोबर.
” अरे, तु व्हय ! ये. कदी आलास ?”
“सकाळी. खास कार्यक्रमाला म्हणून आलो होतो. म्हटलं जाताना तुम्हाला भेटून जावं.”
“व्हय ! बरं झालं की. अन एकटा का ? सुनबाई कुटाय ?”
“नाई आली. पुढल्या खेपेस नक्की घेऊन येईन. ही पोर कोण ?”
” वळकलं न्हाईस ? अरं दादाची !”
” बापरे, गिरीजा ! एव्हढी मोठी झाली ? ”
” व्हय”
” सर कुठायत ?”
” येत्यात, परसाकड गेल्यात. बस, च्या करते. ”
” हो ”
केमिस्ट काकुंचे घर अगदी टापटीप. एकदम आरास मांडल्या सारखं. आजही तसंच. खुप शिस्तीच्या. सर रात्रंदिवस कारखान्यात. काकुने संसार, शेती आणि मुलं छान सांभाळले.
” हं, कायकाय आनी ?” सर आले.
“नमस्कार. मजेत आहे. तुम्ही कसे आहात ? तब्येत ?
” अजुनी धडधाकट आहे ”
” सकाळी दिसला नाहीत, सर, कार्यक्रमात ?”
” होतो की रे, फुडच्या बाजुला बस्लो हुतो. घे, च्या घे. ”
” हो. मी थोडा उशिरा पोचलो. कार्यक्रम संपल्यावर कारखान्यात गेलो होतो. चक्कर मारायला.”
” व्हय ?”
” हो, कुणीच भेटलं नाही”
” हा, सगळे हिकडच अस्नार, कार्यक्रमाला.”
” हो. डेरी कडच्या स्टोअर्स मध्ये पण गेलो होतो.”
” तिकडं आता स्टोअर्स न्हाई. ते बदललं लांब पडाय लागलं म्हुन. तिथ आता काई नाई ”
” आं .. !!
ओके. पण ते बिल्लेकर बसले होते काही काम करत. अजुनी वेडाच आहे तो. काही तरी थापा मारत होता.”
” बिल्लेकर नसेल रे, दुसरं कुनीतर असेल. पन तिथ कुनी नसल बी. ” सर थोडे वैतागून बोलल्यासारखे वाटले.
” नाई नाई, बिल्लेकरच होता. मी ओळखतो ना त्यांना चांगला. भांडला होता तो माझ्याशी. ”
” अरे, बिल्लेकर दोनवर्षापूर्वी कारखान्यातच हार्ट फेल हून मेला. त्यो कसा ………….”
( खल्लास )
Filed under Uncategorized
त्या “यो” !
काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला होणारा फायदा याचा विचार करून, ती यादी मला आधी कळवुन वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होता. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर संबधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहोचलो. औपचारिकता आणि चहापान झाल्यावर मी आणि माझ्या सहका-यांनी धावत पळत जाऊन ट्रेनिंग रूम गाठली. ट्रेनिंग रूम झकपक आणि प्रचंड अद्ययावत होती. दिपुन टाकणारी! माफक आणि निमंत्रीत लोकांनाच बसायला जागा. भराभर मी bag टेबलवर टाकुन आधी laptop काढला. भल्याभल्या ठिकाणी बहुतेक वेळेला प्रोजेक्टर, laptop आणि ऑडियो यांचा ताळमेळ न जुळल्यामुळे सुरुवातीचा वेळ ते सगळं जुळवून आणण्यात जातो आणि नंतरच्या धम्माल गतीला सुरुवातीलाच ब्रेक मिळतो. माझे सहकारी ट्रेनिंगरूम अधिका-याबरोबर वायरींची खोचाखोची करत असताना एक सुमारे पंचवीस सव्वीस वर्षाची जीन्स टी शर्ट घातलेली एकदम ” यो ” दिसणारी पोरगी हातात एक वही घेऊन धावत धावत धडकन रूम मध्ये घुसली. आल्याआल्या तिथे हजर असणा-या सगळ्यांना खाडकन प्रश्न केला –
Is the Program gonna start sharp at 2.30 ?
मी उत्तर दिलं. “Yes, it is, Sharp at 2.30 !”
ट्रेनिंग अधिकारी पुढे जोडलं “Be on time”
विनवणीच्या स्वरात ती म्हणाली “ Sir, I am a mechanical engineer & I want to attend this training in any case !”
माझाशी तिचा संवाद मग सुरु झाला, मी विचारलं “You work with which department?”
“Application Engineering, Sir”
“Ok, if you are invited by your seniors & if your name appears in the list, you will attend.”
That’s what sir, I could not get an email to inform about the training nor my name appears in the list displayed in the canteen.”
“Without wasting time rush to your Department Head & convince him, if you can. I am not the person who can decide who should attend !” मी तिची बोळवण केली.
ती झपकन नाहीशी झाली. माझे सहकारी आणि तो ट्रेनिंग अधिकारी जुगाड करण्यात गुंतले होते. थोडेसे मला तिचे कौतुक वाटले. पुढे ते कौतुक वाटणे माझ्यातल्या विवेकी विचार गटांना मिळुन काही Positive चांगले तर्क काढायच्या आत माझ्या मनातील दुस-या म्हंजे अविवेकी विचार गटाने काही तयार तर्क धडाधड पुढे करून तिची जीन्स, तिचा टी शर्ट, तिचे ते “यो” दिसणे असल्याच बाबींची टिंगल – मनातल्यामनात – केली. म्हणजे ” इतके दिवस झोपली होती का ” ” इथे काय Fashion Show आहे का ” वगैरे ! पण मला फारसा वेळ नव्हता. तेव्हा तिचा विचार ४०-५० सेकंदानी लॉग आउट करून मी माझ्या कामाला लागलो. पहिल्या सात मिनिटात माझी ओळख आणि काही औपचारिक बाबी संपायच्या सुमारास ती “यो” धावत पळत आली. पंचविसात आठ मुली आधीच होत्या, एकत्रच बसल्या होत्या, त्यात हिने नववी बनून कसबसं स्वत:ला माववुन घेतलं. तिचं आत मध्ये येणं यापलीकडे मी फारसा विचलित झालो नाही. अगदी नकळत ‘प्रवेश मिळवला बुवा पाठ्ठीनं’ एवढंच जाणवलं. माझे बोलणे सुरु झाले, पहिल्या दीड दोन मिनिटात आभार वगैरे संपवुन विषय सुरु केला, दोनच तासांचा अवधी होता, मुद्दे बरेच होते. बेभान होऊन एकएक स्लाईड पुढे सरकवत होतो. प्रत्येक स्लाईडवर बोलत होतो. सुरुवातीच्या काही स्लाईडस संपल्यावर बोलण्याच्या ओघात जशी वातावरणातील भीड मी जाणीवपूर्वक चेपवली तसे एकएक जण माझ्याशी बोलु लागला. सटासट प्रश्न येवु लागले होते. मला खूप धमाल येत होती. कधीतरी भानावर येवून घड्याळ बघितलं तर सुरु केल्याला पाउणे तीन तास उलटून गेले होते. पुढल्या पंधरा मिनिटात मी संपवले. प्रोग्राम संपल्यावरची आवरा आवर आणि भेटीगाठी वगैरेची जबाबदारी माझ्या सहका-यांवर सोपवुन मी सटकलो.
भाषण संपवल्यावर किंवा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम संपवल्यावर बोलताना चढलेली ती झिंग मला जास्ती ज्यास्त अंगावर ल्यालेली आवडते. त्या बेभान अवस्थेत मला खुप वेळ राहायला आवडतं. विषयाशी संपूर्ण तादात्म्य पावल्यावर ऐकणा-यांनी त्यांची तंद्री जर माझ्या बोलण्याशी संपुर्ण मिळविल्याचे दिसले तर लहानपणी निपाणीतल्या समाधी मठात व्हायचे तसं होतं. समाधी मठातल्या गाभा-यातला तो ढामढीम करणारा प्रचंड नगारा, लहान मोठ्या त्या कित्येक घंटा आणि त्यातुनही ऐकू येणारे आरतीचे कानडी स्वर हे सगळे एकत्रित ऐकताना मी बेभान व्हायचो, दिवसेंदिवस रात्रोरात्र त्या आवाजांचे धोधो कोसळणे थांबू नये असे वाटायचे, खर तर त्यातल्या प्रत्येक स्वराचा उगम स्वतंत्र पणे ऐकला असता ना तर तो ओरबडणारा, चावरा असायचा. शास्त्रीय संगीताच्या अंगाने तपासाला तर प्रत्येक स्वर म्हणजे नाग-याचा, आरतीचा, घंटांचा , टाळ्यांचा अगदी वेगवेगळ्या पट्ट्यांमधला असायचा. बेसूर वाटावा तसा. पण का कोण जाणे त्या सर्वांच्या एकत्रित आदळणा-या स्वरांनी माझी समाधीच लागायची. सॉलिड झिंग चढायची. अगदी तशीच झिंग असं एखादे भाषण दिल्यावर येते. ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तर कहर होतो कारण सहभागी मर्यादित असतात. वीस. पंचवीस. फार तर फार तीस. चाळीस किंवा पन्नास किवा साठ डोळे आणि तितकेच कान अगदी जवळून आपल्यावर सुरुवातीला त्यांच्या बंदुका रोखून उभ्या असतात. बंदुका अपेक्षांच्या, तिरस्काराच्या, उतावळेपणाच्या, कंटाळलेल्या वगैरे. आपला आवाज, देहबोली, माहिती, ज्ञान यांच्या माध्यमातुन त्या सगळ्या बंदुका विरघळवून टाकण्यात आणि शेवटी समोरच्या सगळ्यांना भजनी लावण्यात भलती झिंग असते. ती झिंग अंगावर चढते. आणि अशावेळी त्या समाधी अवस्थेत काही तरी दृष्टांत होतो. त्याच विषयातला किंवा काहीतरी एकदम वेगळाच शोध लागतो. किंवा लक्खकन एकदम वीज चमकावी तसे काही तरी सुचते, म्हणजे काहीही सुचते. अशा धोधो अवस्थेत मी लिफ्ट मध्ये उभा राहिलो. अगदी सुदैवाने एकटाच होतो. लिफ्ट चे “G” दाबलं. लीफ्ट खाली सरकायला लागली. आणि अचानक एक चेहरा डोळ्यासमोर चमकुन गेला. मी मला थोडं, अगदी थोडंच भानावर आणुन समोर बघितलं. लिफ्ट तर पूर्ण बंदिस्त होती. काचेचे दरवाजे वा अन्य काही ज्यातून त्या त्या मजल्यावरचे दिसेलसे काही नव्हते. कुणाचा तरी चेहरा मी बघीतला. डोक्यावरून पदर असणारा. कोणाचा….? जाऊदे ना, मघाशी अचानक उपटला तसा एखादा अविवेकी विचार पुन्हा उसळी मारून वर आला असेल. या अविवेकी विचार गटांचा फार त्रास असतो बुवा. एकतर त्यांना काही चांगलंचुंगलं चालत नाही. विवेकीविचारगटांवरती यांची सतत दादागिरी चालते. आणि चांगल्या दृष्टीकोनाची प्रचंड नासधूस ते करतात. मला या अविवेकी विचारगटांचा फार त्रास होतो. आणि आगदी च्यायला नको त्यावेळी मनात उपटतात. झुरळ मारण्याचे कसं ते HIT वगैरे असते. तसं काही फुसफुस औषध पाहिजे. किंवा तशी एखादी मच्छरदाणी. जाऊदे. रेटा बाजुला जोर लावुन. झिंग उतरायला लागलीय. तो चेहरा कुणाचा बरं ? आणि असा अचानक समोर का आला असावा! वरती ट्रेनिंगरूम मध्ये त्या सगळ्या ललना अगदी ” यो” होत्या. म्हंजे जीन्स, टी शर्ट वगैरे. त्यात ही डोक्यावर पदर काय भानगड आहे काही क्लु मिळेना त्यामुळे पुन्हा एकदा मी आपली डुबकी मारली. कैफ उतरल्यावर राहिला मात्र तो डोकीवरचा पदर. त्यात एक भर पडली होती ती कपाळावरल्या लालबुंद मळवटाची! त्या तीन तासांची उजळणी करताना मध्येच कुठेतरी तो डोईवरचा पदर आणि आता तो लालबुंद मळवट डोळ्यांसमोर चमकुन जायचे !!!!!! शोध घ्यायचा ध्यास मनाने घेतला. खोलीतले दिवे तर कधीच बंद झालेत हे मला जरा उशिरा लक्षात आलं. एका विशिष्ट वेळी तो मळवट. हो त्या नऊ “यो” सपासप प्रश्नं विचारात होत्या आणि त्यामुळे धमाल येत होती. पण इथे तो पदर आणि मळवटचे काय ? त्या नऊ जणींचा सहभाग उठून दिसावा असावा असा होता. ज्यास्तीत ज्यास्त होता. त्यांनीच खरेतर त्या ट्रेनिंगला कमलीचा जिवंत पण आणला. च्यायला, पोरी तेही मेकॅनिकल इंजिनियर ! केवढ्या शार्प !!! जणु बाकीचे सतराजण तिथे नव्हतेच. त्या पोरीं विषयीच्या भावना आता अभिमाना कडे झुकायला लागल्या. पंधरा मिनिटे होती त्यावेळी भानावर येऊन, खरेतर भानावर आदळून घड्याळाकडे बघितले ना, त्यावेळी एक जोरदार करंट लागुन जाग आली होती. तो करंट अभिमान, कौतुकाचे मिश्रणाने आला होता. पण त्या मिश्रणात आणखी एक धातु होता. उपकृत असल्याचा. ऋणात असल्याचा. त्या तिस-या धातुच्या शोधाच्या वेळीच तो मळवट दिसला. डोई वरती पदर दिसला. एक माउली दिसली. आणि नऊ मुली दिसल्या. माउली त्यांचा पाठ घेत होती. चिमुकल्या मन लावुन शिकत होत्या. आजचा पाठ संपला. नऊच जणींची आजची शाळा संपली. थोड्या पोरीना घ्यायला त्यांचे बाप आले होते. माउलीने त्यातल्या दोघीतिघींना घट्ट पोटाशी धरलं. बाहेर पागोटेवाला उभा होता. त्याने दोघी तिघी चिमुकल्यांना पोचवतो असे सांगितलं आणि पागोटे वाला निघुन गेला. माउली निघाली, लेकरांना घेऊन. थोडी पुढे गेली तो काय, पाठीवर नासके अंडे पडले तिच्या. तेवढ्यात पुढून धोंडा आला डायरेक्ट कपाळावर. सोबत अश्लील शिव्यांची लाखोली. माउली खंबीर पणे पुढे चालली होती. प्रचंड निर्धाराने, माझ्या लेकींना मी शिकवणार. तुम्ही मला दगड मारा. शिव्या द्या. मी सगळं सहन करीन. पण पुण्यातल्याच नाही, तर देशभरच्या माझ्या लेकी शिकल्या पाहिजेत. शिकणं ही काही तुम्हा पुरुषांची मक्तेदारी नाही. तुम्ही ही शिका. पण आम्हालाही ईतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, चाखु द्या. माझ्या समोरच्या या सगळ्या “यो” त्याच माउलीच्याच लेकी. बापरे विषयाची केवढी भक्ती, ……I want to attend this training in any case ” केवढा हा ध्यास! सावित्रीबाई एकशे त्रेसष्ठ वर्षे झाली तुम्ही तुमच्या नऊ लेकींच्या हाती पाटी पेन्सिल देवून. आणि आज त्याची फळे बघा !! आज या नऊ “यो” क्लिष्ट तंत्रज्ञानाचा अभ्यास करू शकताहेत कारण बाई तुम्ही अंगावर चक्क दगड झेलले, नासक्या अंड्यांचा मार खाल्ला आणि पुण्यात नऊ पोरीना गमभनचे धडे दिले ! तुमच्या ऋणातून हा समाज कसा बरं उतराई होणार ? धन्य तुम्ही, आणि धन्य तुमच्या लेकी सुद्धा. तुमच्या योगदाना शिवाय भारत एका अतिशय समर्थ मनुष्य बळाला मुकला असता!
Filed under Uncategorized
सदमा
बडीशेप चघळत बाहेर पडलो तेव्हा रात्रीचा जवळ जवळ एक वाजला होता. नाशिक पुणे रस्त्यावर संगमनेरच्या थोडे अलीकडे असणाऱ्या या ढाब्या कडे आजवर मी कधी ढुंकून बघितलं नव्हतं. पण आज इतका वैतागलो होतो, थकलो होतो की आता गाडी चालवण्याचा कंटाळा आला होता. एक तर सक्काळी चार वाजता नाशिकहून निघालो होतो. पुण्यातले काम आटोपून पुन्हा परत निघायला उशीर झालेला. पुण्याला बहुदा आजवर चालक घेऊन जावसं वाटलं नाही. त्यामुळे मी पुण्याला आलो की चालक नाशकात ऐश करतो. आम जनता बहुतेक नाशिक पुणे रस्त्याला कावलेली असते. पण मला हा रस्ता आवडतो. फुल रोमांटिक रस्ता आहे. गेली कित्येक वर्षे चाका खालून जाणारा आणि नाकासमोरून मागे सरकणारा हा रस्ता आता इतका परिचयाचा झालाय की कोणत्याही वळणावर बाहेर गावी असल्याचे जाणवत नाही. आणि एक झाली की दुसरी खुण कधी येते या वाट पाहण्याची मजा आज ही येते. जाताना आणि येताना दोन्ही बाजूला. सोबतीला, फक्त माझ्यासाठी गाणारा राहतफत्तेह किंवा गुलामअली किंवा अभिषेकीबुवा किंवा आता आनंद भाटे. मध्ये मध्ये तोंडी लावायला अजय अतुल. सॉलिड किक !! बरोब्बर मध्ये येणारे दौलत रेस्तरां तर मजेचा कहर असतो. क्लायमॅक्स. तिथे काही खाणं, रेंगाळणं, नंतर पान, मग पुस्तकं, हे नेहमीच. सगळे दुकानदार आता परिचित असल्याने जरा टाकाटाक्या. शीण निघून जातो. आज पुण्यातूनच निघालोच उशिरा त्यामुळे दौलत मिळणं अशक्य होतं. म्हणुन या धाब्याचे पाय धरले. शी: वाईट आहे. बडीशेप पण फालतु होती. ” नयनोंको तो डसने का चस्का लगा रे ….!” राहत सुरु झाला. या वेळेला संगमनेर च्या आसपास गाड्यांवर चोर लुटारू धाडी टाकतात – असं म्हणतात. म्हंजे आपला त्याच्याशी काय सबंध ! फक्त त्यामुळे रस्ता आता सुस्साट रिकामा होता. दाल फ्रायचा एक घाणेरडा ढेकर आला म्हणुन काचा थोड्या खाली केल्या तेव्हढाच स्पीड कमी झाला. काच वर करून पुन्हा बुम्बाट सुटलो. दिवसाच्या प्रकाशाला लाजवेल असला लखलखीत प्रकाश पडतो हा आपल्या गाडीच्या दिव्यांचा. बहुतेक वेळा ट्रकवालेही त्यांचे दिवे पकपक करून आपल्याला इशारा देतात. समोर लांबपर्यंत म्हंजे दृष्टी पलीकडे रस्ता खेचला होता. सुनसान. लांब एक तांबडा स्पॉट दिसत होता. पुसटसा. असेल काही. पूर्ण डाव्या बाजूला नाही. पण अगदी मध्येच सुद्धा नाही. थोडे बाजूला. पण बऱ्यापैकी रस्त्यात. थोडे पुढे आल्यावर रिफ्लेक्टर चमकले. च्यायला. भर रस्त्यात गाडी उभी करून कुणी शूला उतरला वाटतं. काही जण अॅक्चुली बावळट असतात. बहुदा पुढले दिवे चालू आहेत. मग मागचे कसे बंद ? ऑ !! ? आपोआप माझ्या उजव्या पावलाने पाया खालची पट्टी आणखी जोरात दाबली.
“आई शप्पत………….! हा घुसलाय वाटतं !!!!
राहतला बंद केलं.
हॉर्न वाजतोय त्याचा एक सारखा. समोरून धूर येतोय. आईच्चा, हा ट्रकच्या मागे घुसलाय !!! कसा काय ?
काच्च कन्न ब्रेक दाबले. एकदम डाव्या बाजूला, जरा ज्यास्तच डाव्या बाजूला गाडी उभी केली. बाहेर पडलो आणि गाडीचे टुकटुक करून त्या लाल गाडी कडे पळत सुटलो. पण विसरलो. पुन्हा पळत मागे आलो. टुकटुक. माझी गाडी उघडली. पार्किंगचे पकपक चालू केले. टुकटुक. पण इथे त्या दोन्ही गाड्यांजवळ कुणीच कसे नाही! या पिटुकल्या लालीचा हॉर्न तर वाजतोय. ट्रकच्या मागे घुसलाय. म्हंजे ट्रक सावकाश चालला असेल. हा मागून फास्ट घुसला असेल. पण तो आहे कुठे ? पहिल्यांदा का कोण जाणे ट्रक ड्रायव्हर च्या केबिन कडे पळालो. चढलो. केबिन बंद आत अंधार. आत मध्ये कुणीच नाही. एक वाजून पस्तीस मिनिटं. उतरलो. मागे अडकलेल्या लालीकडे पळालो. लालीचा ड्रायव्हर……*****
आयचा घो !!! हा आत मध्ये काय करतोय ? ओ हलो ……!!! काय झाले ? हलो हलो. उत्तर नाही दिले. म्यला की काय !!! जे काही झालंय ते अगदी आताच झालायं. एकदम फ्रेश. काचेवर त्याच्या थाप जोरात मारली. उत्तर नाही. दगड घेतला आणि फोडली ड्रायवर शेजारची काच. काच बाजूला केली. हलो. खांद्याला हात लावला. ढकलला. त्याने मान माझ्याकडे वळवली. मायला जिवंत आहे. मग बोल्ला. जोरात.
” I am dying ………….! ” ओक्साबोक्शी. आयला फिरंगाए !! वाटत तर नाही. नाई नाई केस काळे भोर आहेत ना. मिश्या पण आहेत. म्हंजे हिंदी तर नक्की येत असेल. साला दुखाताना पण बेनी इंग्रजीत बोलतात. बहुतेक आयटीवाला असणार.
” हलो, चिंता मत करो. मैं हु ना.
पैले गाडी तो बंद करो. गाडी चालू ही रक्खा है.”
हा सॉलिड घाबरला होता. त्याची प्रचंड फाटली होती. घामाने डबडबला होता.
उधरकी काच खोलो. त्याने बटन दाबून काच खाली केली. हा. म्हंजे गाडी बऱ्यापैकी अजुनी नियंत्रणात आहे.
गाडी बंद करो ना. त्याने बंद केली. हॉर्न आपोआप बंद झाला.
पानी है क्या ? डोलला. नाही.
माझ्या गाडीकडे पळालो. पाणी आणलं. त्याला पिऊ दिलं. मला आता टेन्शन होतं त्याचे पायांचं. पाय तर गेले नसतील ? बाजूने गाड्या जात होत्या अधून मधून. ट्रक जात येत होते. थांबत नव्हते कुणी. याला डायरेक्ट कसं विचारायचं ? पाय ठीक आहेत ना ? नको. गेले असतील आणि त्याला जाणवलं तर हार्ट फेल होऊन मरायचा.
“गाडी शुरू होता है क्या देखेंगे” जरा स्टार्टर मारो. त्याने गाडी सुरु केली.
बॉस अब एक काम करेंगे. रिव्हर्स मार के गाडी पीछे लेंगे.
अरे नाई साब. एकदम माझ्यावर किंचाळला. I am dying. पुन्हा तेच तुणतुणं.
“Can you organise a crane ?”
“Crane …..!” आता मी किंचाळलो. २ वाजून दहा मिनिटं.
माझ्या डोळ्या समोर दोन वर्षापूर्वी जावळेवस्ती म्हंजे जवळजवळ संगमनेर मध्ये भर रात्री साडेनऊ वाजता एका दुचाकी वरच्या दोघांना एका ट्रकने उडवलं होतं तो अपघात आठवला. आजही थरकाप होतोय असा तो अपघात होता. तिथे कशाला हात लावायची सोय नव्हती.भयंकर अपघात होता. वेगाने मी संगमनेरच्या पोलीस ठाण्यात गेलो. पण मला प्रतिसाद देऊन घटनास्थळी पोचायला पोलिसांनी तब्बल एक तास लावला होता. भर साडेनऊ वाजता. आत्ता सव्वादोन वाजता रात्री इकडे कोण येणार.
“क्रेन मिलना मुमकिन नही है मेरे दोस्त, अगर मिलेगी भी तो काफी वक्त लगेगा यहाँ पहुँचने में.
” O God ……” पारच खचला तो !
” अरे दोस्त चिंता मत करो. मैं हुना. एक काम करो. रिव्हर्स डालो.”
त्याने नाईलाजाने रिव्हर्स टाकला.
“अब जितने जोरसे पीछे जा सकते हो उतने जोरसे पीछे जाओ.” मी त्याला समजावलं.
” मुझसे नही होगा, सर ” पोहायच्या कोच ला पोरं विनवतात ना तसे हा मला विनवत होता.
” बिवी को फोन किया ?”
बोलला ” नही ”
“क्यो ?”
“She is pregnant, Sir”
“तो उसको मिलना नही ? ”
काही बोल्ला नाही.
एक विचार आला. माझ्या गाडीला बांधून …..!
अशक्य. मला माझ्या मर्सिडीजला ओरखडाही चालत नाही आणि माझी गाडी मी या माठ्याला खेचायला अजिबात वापरणार नाही.
” चलो मारो रिव्हर्स. एक काम करो. पैले धीरे से ले लो. ”
त्याने गाडी मागे घायचा प्रयत्न केला. आणि मी ” येस्स” केलं. पाय आहेत.
“अब लेलो जोरसे. गाडी पीछे जा सकती है.”
त्याने अलगद गाडी मागे घेतली. ड्रायव्हर समोरची काच धप्पकन आत त्याच्या अंगावर मोडून पडली.
” नो प्रॉब्लम, उसको आरामसे निकालेंगे. पैले गाड़ी ट्रक से बाहर लो.”
आली एकदा गाड़ी बाहेर आली. मला कोण आनंद !!!!
त्याच्या अंगावरच्या काचा काढल्या. त्याला म्हटलं ये बाहेर. तो बाहेर आल्या वर माझी खात्रीच पडली. हा नक्की आयटीवाला आहे. म्हंजे ती ते घालतात तशी चड्डी. थोडा पातळ, जीर्ण टी शर्ट, पायात चप्पल. म्हंजे फ्लोटर्स. आणि सचिन तेंडुलकर सारखं हिंग्लिश. म्हंजे सचिन ची हल्ली एक जाहिरात येते ना, मीर्चीवर बहुदा. “लाइफ मध्ये ऑल्वेज इम्प्रोव्हमेंट पाहिजे……” मसाला पानात एखादा वेलदोड्याचा दाणा लागावा तसा मराठीचा एखादा शब्द पण पूर्ण वास मात्र उग्र वेलचीचा.” तसे शब्द सगळे इंग्रजी पण वाक्यरचना मराठी आणि एखादा शब्द मराठी.अशी सचिनची जाहिरात हल्ली वाजते आहे. हा असेच हिंग्लिश बोलत होता. त्यामुळे आयटीवाला असल्याची खात्री पटत होती.
” हलो, मैं सुधीर. सुधीर मुतालीक.”
“हाय, I am Amit Wagh ”
अरे, हा तर आईचा लेकरू निघाला. अरे पण मघाशी मी पहिल्यांदा मराठीत सुरु केल्यावर हा इंग्रजी मध्ये आणि हिंदीत का बरं घुसला.
“नाशिकचा ?”
” नाई, इन लॉज, नाशिक चे ! तिकडे चाललो होतो. वाटेत पार्क केलेला ट्रक दिसला नाही. Idiot, he has not even kept the parking lights on, you know ”
तीन वाजून दहा मिनिटं .
“बर, मित्रा आता एक काम कर तुझ्या गाडीला काही फार गंभीर प्रोब्लेम दिसत नाही. मी तुझ्या गाडीच्या पुढे हळूहळू माझी गाडी चालवतो. तु माझ्या मागे ये. हा माझा मोबाईल नंबर घे. मला ही रिंग दे. मध्ये काही अडचण आली तर मला फोन करत रहा. हा, हो आणि तु काय काम करतो ?
” आय टी इंजिनियर आहे. ”
मी mute दाबून ” येस्स ….!”
“नाशकात राहतो कुठे ? ”
“महात्मा नगर”.
“मग छान मी तुला ABB चौका पर्यंत सोबत करतो, म्हंजे अगदी घरा पर्यंत”.
गडी खुश. मध्ये मी सारखं त्याला फोन करत होतो. तो म्हणायचा ” आल इज वेल”
इप्सित चौकात पोहोचलो. सहा वाजून वीस मिनिटे.
त्याला शेवटचा फोन केला.
” मित्रा आता निघू का मी ?”
म्हटला ” हो मी आता इथून जातो. बाय. ”
संध्याकाळी निवांत वेळ मिळाल्यावर बायकोला सगळं सांगितलं.
” तु थांबलास म्हणुन बरं, नाई तर त्याचं काय झालं असतं कोण जाणे. त्याचा फोन आला दिवस भरात काही ?”
म्हटलं “नाही. झोपला असेल गं काऊन जीवाला.”
“मग त्याच्या घरच्यांचा ”
“नाही”
ही घटना घडून सात महिने झाले. त्याचा कधीच फोन आला नाही. पुण्याला जाता येता त्या घटनेची आणि आणि त्या हिरोची आठवण व्हायची. आणि उगीचच जाणवायचं की याचा फोन नाही आला. एकदा ठरवलं मीच त्याला फोन करून त्याची विचारपूस करावी. म्हंजे आपल्याला शांती लाभेल. माझ्याकडे त्याचा नंबर होताच.
रिंग केली’
तिकडून आवाज ” येस…”
” हलो अमित ?”
“Yes, Amit. Who is this …………………?”
मी फोन बंद केला.
Filed under Uncategorized
A Great Karadian ….!
I can very much imagine that my Grand Grand Son say Rohan is getting a call from his client on an evening ! Call from the client to visit his office next day morning at 10 am to discuss an important order finalisation. Rohan before going to bed asks his wife – as an additional care – to wake him up at 5.30 am. ‘Being wife’ she asks Rohan the reason for getting up an hour before the routine time. In explanation Rohan says ” I have to see a customer tomorrow for a finalisation. The customer is at MG Road in the Bharat province on the Moon. I have to leave home atleast at 7.30 am ..! Good Night.
Don’t scratch your head much. I can very well see that reaching on the moon in an hours time, in fact in a few minutes- from anywhere on the earth will be easily possible, may be after 50 years, 100 years. Laughed at me ? Hey, chill. It was not possible to reach Singapore within 5 hours in the year 1912 ! 100 years ago. In 1912 an imagination of reaching Singapore in five hours was a cause of scratching head, was a teaser, isn’t it ? On Wednesday, 4th July this year thousands of scientists from the world gathered in Geneva have given a sense to my imagination. They had a discovery. Discovery of a particle similar (they call it “consistent”) to that particles which have given existence to the universe. Higgs boson as these particles are called. I don’t like the other popular name. The popular name is God’s Particles. Higgs boson exist, but they can not be seen. So Higgs boson is a theoretical particle but Peter Higgs said in 1964 that the particle was responsible for Mass. Without the particle no Gravity is possible ! And my imagination starts here, Now that they have seen Higgs Boson & may be after experiments for 50 years or may 100 years if they are successful in detaching the particle from the matter, matter can travel with the speed of light !!! Yes, then will it not be possible to reach the Moon within a few seconds ?
My imagination is not important, what is important is the relentless efforts of the entire scientific community in the discovery. The Large Hadron Collider built by the scientists at European Center for Nuclear Research ( CERN) in Geneva itself is a miracle of this century. Without this 27 km long underground ringed tunnel with ultra complex control systems it would not have possible for the world to do the experiments. And here comes the matter of pride for all Indians and especially those who are associated with College Of Engineering Karad. I feel so proud that our friend Ms Anupama Kulkarni was one of the team members of the scientists at Geneva to contribute for this experiment. Anupama works with BARC. She did her Bachelors In Electrical Engineering in 1993 from COEK. She was deputed to work at CERN in Geneva for two years. I am happily sharing with you herewith her pictures while working at CERN, Geneva.
After the phenomenal achievement of the scientists on 4th July, Anupama wrote to me in an email :
“…..As an Indian, we all feel proud due to association of Shri Bose, but after him or Dr. Bhabha, who is next? On the horizon of particle physics, we are very small. The question is how, as an Individual, I (every Indian) am going to change the situation? (Lack of united national feeling)………….Oh, my mail is flowing to some other direction!! (But, I couldn’t resist this) . Any news coming from LHC, I go to the same state of mind as if I am in CERN Control Centre and enjoying the all lively atmosphere forgetting EVERYTHING else and then wish “Kash, ye Bharat me kyu nahi hota?…….”
Anupama, with young scientists like you in India, I am confident one day ” Ye Bharat mein bhi Hoga”.
Here are a few pictures of Anupama :
Above Anupama with her colleagues at the CERN Control Laboratory
In the Underground Tunnel of LHC.
You made us all Proud, Anupama.
by Sudhir Mutalik
Filed under Uncategorized

