जनलोकपाल बिल कदाचित येईल. कायदा होईल. कारण अण्णांचा निग्रह आणि त्या निग्रहाला असणारे नैतिक अधिष्ठान वादातीत आहे. दिपून टाकणारे आहे. आम जनतेच्या मानसिकतेच काय? आम्हाला ‘सत्याग्रहाचा’ अर्थ कळतो का? आपल्यावरही एक कठोर जबाबदारी येते हे कळलंय का? किती सत्याग्रही आईबाबांनी आपल्या अकरावीतल्या परवाना नसलेल्या सुपुत्रांकडून तो शिकवणीला जाण्यासाठी अवैधपणे वापरत असणारी फटफटी काढून घेतली? ज्यांचा देशभर बोलबाला होतोय त्या किती युवकांकडे सत्याग्रहाचा फटफटी मोर्चा काढताना वाहनधारक परवाना होता? भ्रष्टाचाराचा अर्थ फक्त पैसे देवाण घेवाण असा लावला जाणार असेल तर कायदा किती परिणामकारक होईल? अन्य कायदे दिसतात का समाजात उतरलेले? म्हंजे ते हरामखोर डॉक्टर! पाडतात ना खून पोरींचे खुलेआम , पैशासाठी ! ती नालायक आई किंवा षंढ बाबा, त्यांना माहिती नाई का की पोटाच्या अंकुराला खरवडणं अमानवी आहे, हिंस्र पणाचा कळस आहे आणि कायद्याने ही गुन्हा आहे. लाल लागला की किती सत्याग्रही इमाने इतबारे थांबतात ? पिवळा पडला की किती जण हल्ली स्वत:ला रोखतात? असे अनेक प्रसंग. अहो ही भ्रष्ट मानसिकता काय नव्याने ओळख करून द्यावी इतकी अनोळखी आहे का आपल्याला? जागोजागी दिसते, आपल्यातही असते. कायद्याने कदाचित राजकारण्यांचे, वेगवेगळ्या सत्ताधीशांचे पैसे खाणे थांबेल पण आपल्या भ्रष्ट मानसिकतेला आपण स्वच्छ करणार का? म्हंजे अण्णांच्या योगदानाचे मोल कमी करण्याचे पाप नाही हं मला करायचे. त्या ऋणात तर हा समाज अखंड राहील. ते बिल, त्या साठी झगडणा-या लोकांचे योगदान ही थोर आहेच. दुसऱ्या बाजुला, सत्याग्रह करून क्रांती करता येईल पण आपल्या मनाचे परिवर्तन करण्याची लढाई आपण आपल्याशी कठोरपणे लढलो नाही तर प्रत्येकाची धुलाई करायला एवढे अण्णा आणणार कोठून ?
Monthly Archives: September 2011
सत्याग्रही……

Filed under Uncategorized
आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ….!
काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, “अरे, आज इतका उशीर का ?” त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. ” काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत ‘बसलो’ होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत. त्यामुळे आज जरा उशीर झाला.” मी ” ओके, गुड डे.” एवढंच म्हणालो. मित्राच्या निवेदनाला लॉग आउट केलं आणि गाडी कडे सटकलो.
गणपतीच्या आदल्या दिवशी काय नसतं जे त्या दहा दिवसात असतं ? म्हंजे आदल्या दिवशी गणपती पिताना बघत नाई का ? तो आलेला नसतो म्हणुन त्याला चालतं की तो आलेलाच नाही त्यामुळे त्याला विचारायचा संबंधच काय ? किंवा तो आलेला नसल्यामुळे तो बघू शकत नाही, त्याला समजतच नाही. या पिण्याच्या पार्श्वभूमीवर तर एक भारी किस्सा आहे माझ्या कडे. आमच्या गावात म्हंजे निपाणीला एक देवी असते. बहुतेक ग्राम देवता वगैरे असते. कारण ती एका किल्ल्यात असते. जुना भुईकोट किल्ला असतो. नवरात्रतात मोठा उत्सव असतो. असणारच. देवी आहे. दसऱ्याच्या पूजेला देवीला चक्क दारूचा नैवेद्य दाखवतात. आणि नैवेद्य म्हंजे असं छोट्याश्या वाटीत चमचाभर वाढून नाई देत. डायरेक्ट बाटली – म्हंजे क्वार्टर – उघडतात आणि देवीच्या नाकाला लावतात. तशी पद्धतच आहे. आणि मग तिचा चेहरा भक्तांना दाखवतात. पुण्यवान लोकांना म्हणे तिचा झिंगता चेहरा आरशात दिसतो. खूप लहान असताना मला खूप टेन्शन यायचं. कारण मला ती झिंग कधीच दिसली नाही. आता बोला. देवाला हवी की नको ? त्याच्या समोर चालते की नाही ?
माझा त्याचा फारसा सबंध भर यौवना पासुन नाहीच. म्हंजे त्यांच्या पैकी – गणपतीआदी – कुणाचाच संपर्क नाही, फारसा परिचय ही नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात पाळायची पथ्ये ही फारशी माहिती नाहीत. पण वाचना मुळे त्यांच्या – म्हंजे दिवाबिवाच्या – काही खास बाबी माहिती आहेत. म्हंजे परमेश्वराने चराचर व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना. भक्त प्रह्लादाने नाई का त्याच्या उद्दाम बापाला, हिरण्यकश्यपुला सांगितलं होतं की माझा नारायण सगळी कडे आहे. या खाम्बामध्येही आहे. त्याच्या बापाने मग खांबाला लाथ मारली. लाथ लागल्यामुळे रागावून त्यातून नरसिंह नामक नारायणाचा अवतार बाहेर आला .त्याने हिरण्यकश्यपुला मारून टाकलं. हे सगळ्यांना मीहिती असेलच ना. म्हंजे श्रद्धाळूना तरी. पण तरीही हेच श्रद्धाळू ” चोरून” एखादी गोष्ट कशी करू शकतात ? चोरून म्हंजे इकडे तिकडे कुणी बघत नाही असं बघून. वा समजून. हो, म्हंजे डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखं.
Filed under Uncategorized